मुंबई : राजकीय व्यक्तींच राजकारण आपण अनेकदा अनुभवतोच पण त्यांच्यातील साधेपणा हा सगळयांनाच भावतो. असाच साधेपणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अनुभवता आला आहे. केंद्रीय ंत्री नितीन गडकरी विमान प्रवास करताना चक्क सर्वसामान्यांच्या रांगेत उभे दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यतः राजकारण्यांना रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा इतर ठिकाणी विशेष सवलत मिळते आणि त्यांना तेथे व्हीआयपी म्हणून सेवा मिळते. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री विमानात चढण्यासाठी रांगेत थांबलेले दिसत आहेत. या व्हिडिओतील नितीन गडकरींचा साधेपणा दिसला आहे. या साधेपणाने सर्वांचे मन जिंकले आहे.



वास्तविक केंद्रीय मंत्र्यांना इंडिगोच्या विमानात चढायचे होते. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की विमानात चढत असताना नितीन गडकरी सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभे आहेत. अनेक लोक केंद्रीय मंत्र्यासमोर उभे आहेत आणि त्यांचा नंबर आल्यावर विमानाच्या आत प्रवेश करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की केंद्रीय मुखमंत्री मास्क घालून सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभे आहेत. 


नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील एक भारदस्त नेतृत्त्व. मात्र केंद्रीय मंत्री असूनही गडकरींचा साधेपणा नागरिकांना पाहायला मिळाला. विमानात जाण्यासाठी ते चक्क सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहीले. खरंतर ते व्हीआयपी  रांगेतून विमानात जाऊ शकले असते. मात्र त्यांनी तसं न करता सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून विमानात प्रवेश केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरच चांगलाच व्हायरल होत असून गडकरींवर कौतुकाचा वर्षाव होतोय.