University of Mumbai : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांना बसला फटका!
University of Mumbai : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठाच्या ( University of Mumbai ) डिग्री प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.पदवीधर अभ्यासक्रमासाठी खंड पडलेले किंवा परत अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अनेक समस्या भासवत आहेत.
University of Mumbai : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठाच्या ( University of Mumbai ) डिग्री प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे. डिग्री कॉलेज साठी पुन:प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पदवीधर अभ्यासक्रमासाठी खंड पडलेले किंवा परत अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अनेक समस्या भासवत आहेत.
रुईया कॉलेज ( Ramnarain Ruia College ) मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला बारावीत 81. 00% टक्के गुण प्राप्त झाले होते. काही अडचणींमुळे तिच्या अभ्यासक्रमात खंड पडला होता आता पुन:प्रवेश घेताना विद्यार्थिनीला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई विद्यापीठात ( University of Mumbai ) अनेक वेळा फेर्या मारून सुद्धा विद्यार्थिनीला समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे तिने खंत व्यक्त केले. विद्यापीठाने अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारे तारीख अद्याप जाहीर केली नाही किंवा त्याची कोणतही माहिती वेबसाईट वर सुद्धा उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांनी कोणतीच कल्पना नसल्याने त्यांना अनेकदा विद्यापीठाच्या फेर्या माराव्या लागत आहेत.
विद्यापीठाच्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर भवन एम के सी एल विभाग बाहेर दररोज विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. पण अधिकारी आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे वारंवार सांगत आहेत. अश्याप्रकारे सुरू असलेल्या विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे पालक चिंतेत पडले आहेत. तर विद्यार्थ्यांना आपले वर्ष वाया जाईल याची भीती सतावत आहे.
आता विद्यापीठ त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर किंवा सोशल मीडिया वर याबाबत कधी माहिती अद्यावत करते हे पाहणे गरजेचे असेल.