Sheetal Mhatre : शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे (prakash surve) आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. या व्हिडीओचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले होते.  आमदार प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शनिवारी श्रीकृष्ण नगर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी काढण्यात आलेल्या व्हिडीओ सध्या व्हायरल होत होता. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता  हे प्रकरण वेगळ्याच वळणावर पोहोचलं आहे. मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदनेही (Uorfi Javed) या प्रकरणात उडी घेतली आहे. चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे प्रकरणावरुन महिलांवर होणाऱ्या अत्याचावरुन टीका केली होती. त्यावरुन आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.


काय म्हणाल्या चित्रा वाघ?


"राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा पद्धतीने त्रास दिला जातो, हे आपण आजपर्यंत पाहिलं आहे. पण आता विकृतीने कळस गाठला आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्ह्ययरल होत आहे. एखाद्या बाईला थांबवू शकत नाही, मग तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, अशा पद्धतीचे विकृती व्हिडिओ बनवले जातात आणि तिची बदनामी केली जाते. हा प्रश्न एका शीतल म्हात्रेचा नाही, शीतल सारख्या हजारो महिला राजकारणात काम करतात. आज तिचा नंबर आहे, उद्या आमचा नंबर असेल, त्यामुळे हा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 


उर्फी जावेदने चित्रा वाघ यांचा व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "माझ्या कपड्यांवरुन माझ्या चारित्र्यावर बोट उचचलं जात होते, मला तुरुंगात टाकण्याची मागणी केली जात होती ते विसरलात. उघडपणे माझं डोकं फोडण्याची धमकी दिली गेली होती. वाह वाह वाह. ढोंगीपणाची सीमा असते हे कोणीतरी या बाईला सांगा," असे खोचक ट्विट उर्फी जावेदने केले आहे.



दरम्यान, शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. आमदार यामिनी जाधव, आमदार मनिषा चौधरी, आमदार भारती लव्हेकर यांनी यांनी हे प्रकरण विधानसभेत लावून धरले. यानंतर सरकारने या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे होणार आहे.