Richest Thief in India : चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. अटक करण्यातआलेले चोर आर्थिक परिस्थितीमुळे चोरीच्या मार्गाकडे वळल्याचं सांगतात. पण तुम्ही कधी श्रीमंत चोर पाहिलात का? पोलिसांनी नुकतंच एका चोराला अटक केली. या चोराची संपत्ती ऐकूण पोलीस हैराण झाले. भारतातल्या या श्रीमंत चोराकडे (Thief) जॅग्वार कार (Jaguar) आहे, चोरी करण्यासाठी तो विमानाने प्रवास करतो, तर ज्या शहरात  तो चोरी करायला जातो, त्या शहरातल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो राहातो. इतंकच नाही तर या चोराच्या तब्बल 10 पत्नी आणि 6 गर्लफ्रेंडसुद्ध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातला श्रीमंत चोर
एखाद्या उद्योगपतीला लाजवेल अशी या चोराची संपत्ती आहे. उत्तरप्रदेशमधल्या गाझियाबादमधला (Ghaziabad) हा चोर असून गाझियाबाद पोलिसांनी या चोराला अटक केली आहे. या चोराची एक पत्नी सीतामढी जिल्हा पंचायत सदस्य आहे. तर दुसरी पत्नी भोजपूरी चित्रपटांमध्ये अभिनेत्री आहे. अभिनेत्री असलेल्या पत्नी मुंबईत अलिशान घरात राहाते. या चोराची खासियत म्हणजे ज्या शहरात तो चोरी करतो, त्या शहरातील एखाद्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि 


गाझियाबादलमधल्या कवीनंगर कोतवाली पोलिसांनी या चोराला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जॅग्वार कारही जप्त केली आहे. पण ही लक्झरी कार या चोराच्या पत्नीच्या नावे नोंद आहे. बिहारमधल्या सीतामढीमध्ये राहाणाऱ्या या चोराचं नाव मोहम्मद इरफान उर्फ उजाले असं आहे. आपल्या किती पत्नी आहेत याचा निश्चित आकडाही त्याला माहित नाही. पोलिसांच्या चौकशीत त्याने दहा पत्नी आणि सहा गर्लफ्रेंडची नावं सांगितली.


एक पत्नी जिल्हा पंचायत सदस्य
धक्कादायक म्हणजे मोहम्मद इरफानच्या काही गर्लफ्रेंड अशा आहेत की ज्यांची दुसऱ्यांदा भेट झाली नाही. याबाबत विचारल्यावर त्याने पोलिसांना हैराण करणारं उत्तर दिलं. ज्या शहरात चोरी करतो, त्या शहरातील एखाद्या मुलीशी मैत्री करतो. मोहम्मद इरफानची एक पत्नी सीतामढीतच राहाते आणि ती जिल्हा पंचायत सदस्य आहे. मोहम्मद इरफान चोरीचं काम करत असला तरी गावकऱ्यांसाठी तो रॉबिनहूड आहे. 


चोरीच्या पैशातून गावाचा विकास
मोहम्मद इरफान शहरात चोरी करतो आणि या चोरीतला मोठा हिस्सा तो आपल्या गावच्या विकासकामांसाठी खर्च करतो. मोहम्मद इरफान राहात असलेल्या गावात सर्व पक्के रस्ते आहेत. गावात वीज असून याचा सर्व खर्च मोहम्मद इरफानने केला आहे. इरफानने केलेल्या विकासकामांमुळे त्याला गावात मोठा मान असून पंचायत निवडणुकीतही त्याची पत्नी बिनविरोध निवडून आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरफान मोठ्या शहरात रेकी करुन मोठा हात मारत होता. 


मोठ्या चोरा करायचा इरफान
इरफान चोरी करण्याआधी त्या शहरात 10 दिवस राहायचा. मोठ्या फ्लॅट आणि बंगल्याची तो रेकी करायचा आणि संधी मिळताच लाखो करोडोंचा हात मारून फरार व्हायचा. बिहार ते दिल्लीचा प्रवास तो आपल्या जॅग्वार कारमधून करायच. त्यानंतर ज्या शहरात जायचं आहे त्या शहरात तो दिल्लीने विमानाने प्रवास करायचा. त्या शहरात गेल्यावर इरफान सुटाबुटात असायचा तसंच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याचं राहाणं असायचं. हॉटेल बूक करताना आपलं नाव तो आर्यन खान असल्याचं सांगत आपण मोठे उद्योगपती असल्याचं सांगायचा.