मुंबई : मुंबई महापालिकेत २००९ नंतर सर्वात मोठ्या मेगाभरतीला आजपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण १३८८ जागा भरल्या जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाइन लिमिटेड कंपनीतर्फे या भरतीचे नियोजन होणार आहे.


तसेच ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.


कोणते विभाग ?


जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण असे अत्यावश्यक विभाग


कोणत्या जागा ?


कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्ग


किती जागा ?


चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण १३८८ जागा


कुठे मिळतील अर्ज ?


 http://portel.mcgm.gov.in, mcgmlaboourrecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज उपलब्ध आहेत.


शेवटची तारीख


३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.


कधी होणार परीक्षा ?


फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा