मुंबई : आजपासून सुरु झालेला ऑगस्ट महिना सुट्ट्यांचा सुकाळ घेऊन आलाय. सळग सार्वजनिक सु्ट्ट्या आल्याने अनेकांनी सुट्ट्यांचे नियोजन केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग तीन आठवडे वीकेण्डला धरून सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे मान्सून प्रमींची मज्जा झालेय. त्यामुळे मधले एक वा दोन दिवस रजा घेऊन सलग ५ ते ६ दिवसांचे सुट्ट्यांचे नियोजन करता येऊ शकते.


तुम्ही ४ ऑगस्टला सुटी घेतली तर पुढचे ५ ते ७ ऑगस्टपर्यंतचे सलग तीन दिवस सुटी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही ४ दिवसांचा प्लान करु शकता. 


तसेच १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शनिवार-रविवार, १४ ऑगस्टला जन्माष्टमीला सुटी घेतल्यास १५ ऑगस्टला पुन्हा स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, त्यानंतर १६ ऑगस्टला सुट्टी घेतल्यास १७ ला पतेतीची सुट्टी अशा सलग ६ दिवसा सुट्ट्या मिळतील.


त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा २५ ऑगस्टला शुक्रवारी गणेशोत्सव आणि त्यापुढे शुक्रवार, शनिवार अशी लागून सुटी घेऊन तुम्ही एन्जॉय करु शकता.