सनातनच्या साधकाच्या घरावर एटीएसचा छापा, ८ बॉम्ब जप्त
पोलिसांनी श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केले होते.
मुंबई : महाराष्ट्र एटीएसनं सनातन संस्थेचा पदाधिकारी वैभव राऊतच्या घरावर छापा घातलाय. काल रात्री साडेआठ वाजल्यापासून एटीएसचे पथक वैभवच्या घरी होतं, सकाळी आठपर्यंत या छप्याअंतर्गत कारवाई सुरु होती. एटीएसच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले असून वैभवला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आलयं. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी डॉग स्कॉडही बोलवलंय. वैभव राऊतला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सनातन संस्थेच्या साधकाच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांच्या हाती अनेक संशयास्पद वस्तू लागल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एटीएसने नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 'सनातन'च्या वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकला. याठिकाणी पोलिसांना अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केले होते. या तपासादरम्यान पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी सध्या वैभव राऊतला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी या सगळ्याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.