मुंबई : मुंबईत आज वंचित बहुजन आघाडीने धरणं आंदोलन पुकारलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५ हजारहून अधिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात हे धरणं आंदोलन आहे. दादर टीटी, ऑगस्ट क्रांती मैदान आणि धारावी अशा ठिकाणी हे धरणं आंदोलन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनामुळे मुंबईत दादर टीटीसह अनेक मार्गांची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. दादरमधील टिळक ब्रिज सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. तर ठाणे, पुण्याहून येणाऱ्या जड वाहनांना शिवडी, वडाळा मार्गे दक्षिण मुंबईकडे जाता येईल. 


तसंच दादरहून उड्डाण पूलमार्गे परेल, एलफिन्स्टनहून वरळीकडे जाता येईल. धरणं आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.