वांगणी रेल्वे दुर्घटना : मयूर शेळकेचा `त्या` अंध मातेला मदतीचा हात
आपल्या बक्षीसातील अर्धी रक्कम अंध मातेला देणार
मुंबई : वांगणी रेल्वे स्थानकावर आपला जीव धोक्यात घालून एका 6 वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवून मयूर शेळके या रेल्वेच्या पॉइंटमन आपल्या शौर्याच दर्शन घडवले होते. मात्र आता मयूरने आपल्या बक्षिस स्वरूपात मिळणाऱ्या रक्कमेतील अर्धी रक्कम त्या अंध मातेला देण्याचे जाहीर करून आपल्यातील माणूसकी देर्शन घडविले आहे
.मयूरने त्या दिवशी दाखवलेल्या धाडसा बद्दल रेल्वे बोर्डाकडून त्याला पन्नास हजार रुपयाचे बक्षीस जाहीर झाले आहे.मात्र या मिळणाऱ्या रकमेतील पंचवीस हजार रुपये मयुरने त्या अंध मातेला देण्याचे जाहीर केले आहे . मयूरच्या या निर्णयाचे सर्वच स्थरातू कौतुक होत आहे.
तसेच मयूरने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक म्हणून जावा मोटरसायकलने त्याला एक नवीन बाईक भेट देण्याची घोषणा केली. क्लासिक लीजेंड्सचे प्रमुख अनुपम थरेजा यांनी ही माहिती दिली आहे. क्लासिक लीजेंड्स महिंद्राच्या मालकीचा एक ब्रँड आहे, ज्या अंतर्गत जावा मोटारसायकली विकल्या जातात. हा व्हिडिओ शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले की, मुलाचा जीव वाचवण्यासाठी पॉईंटमॅनने आपला जीव धोक्यात घातला. आम्ही त्याच्या धैर्य आणि कर्तव्याला सलाम करतो.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा अचानक रेल्वे ट्रॅकवर जावून पडतो. समोरुन वेगाने एक्सप्रेस येत आहे. मुलाची आई अंध असल्याने तिला मुलांला वर घेता येत नव्हतं. त्यावेळी येथे कर्तव्यावर असलेल्या पॉईंटमन मयुर शेळके धावत आला. त्याने या मुलाचा जीव वाचवला. ही घटना अंगावर काटा आणणारी आहे.