मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. हाताला काम नाही. मात्र, एक दिलासा देणारी बातमी आहे. तुम्ही नोकरीच्या (Recruitment) शोधात असाल तर ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने नोकरीची (Government JOb) संधी उपलब्ध करुन दिली आहे. आधी पोलीस दलात भरती करण्यात येणार आहे. आता पुन्हा एकदा सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शिक्षण खात्यात (Education Department) भरती करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी नोकर भरतीबाबत ट्विट करत या भरतीची माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. (Varsha Gaikwad Announced Recruitment in Education Department).



मात्र, ही भरती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण 266 पदांपैकी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.