मुंबई : Shiv Sena Youth Secretary Varun Sardesai : महाराष्ट्रातील शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर आता त्यांच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे अनेक खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याबाबत पत्र सादर केले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आता पक्ष वाचवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आता तर शिंदे गटाकडून युवा सचिव पदावरुन वरुण सरदेसाई यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांचा शिवसेनेमधला संघर्ष आता टोकाला जाताना दिसत आहे. शिंदे गटानं युवा सेना सचिव पदावरुन वरुण सरदेसाई यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी किरण साळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किरण साळी मागील काही वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असून आमदार आणि माजी शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.


किरण साळी यांनी यापूर्वी देखील युवा सेनेत काम केले आहे. त्यांच्याकडे युवासेना सहसचिव पदाची जबाबदारी होती. आता मात्र शिंदे गटासोबत दाखवलेल्या निष्ठेने त्यांना थेट वरुण सरदेसाई यांच्या जागी नेमण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांची सुरुवात देखील युवासेनेमधूनच झाली असल्याने या पदाला मोठे महत्त्व आहे.