मुंबई : वसईत मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती पत्नीला एका कारने जोराची धडक दिली आहे. या धडकेत पती-पत्नी ५ ते १० फूट उंच उडून खाली पडले आहेत. एकजण चाकाखाली आला तर चक्क चालकाने त्याच्या अंगावरून कार घालून फरार झाला आहे. या  अपघाताचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई पूर्व एव्हरसाईन बस थांबा, सेक्टर २ जवळ आज सकाळी ६ वाजता भरधार कारने दोघांना उडविले. या घटनेत दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलिवण्यात आले आहे. त्यांच्यावर वसईतील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीर सिकंदर अली आणि मीर सलमा अली दोघे पती-पत्नी सकाळी फिरत होते. त्यावेळी भरधाव कारने दोघांना जोरदार ठोकर देत फरफट नेले. दरम्यान, कार चालक अपघातानंतर फरार झालाय.