स्विमिंग पूलमध्ये बुडून ८वर्षीय मुलाचा मृत्यू
विरार मधील जलतरण तलावात ८वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
वसई : विरार मधील जलतरण तलावात ८वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री ८च्या सुमारास घडली आहे. युग लाडवा असे ८ वर्षीय मुलाचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युग लाडवा वसई पश्चिम वसंत नगरी येथील राहणार आहे. युग हा नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या बॅच ला पोहण्यासाठी आला होता दरम्यान ही घटना घडली. युगला पुढील उपचारासाठी वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झला.
याप्रकरणी महापालिका तलावाचे व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा जीव गेला असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक पालक त्यांच्या मुलांना अशा स्पर्धांसाठी क्लास लावतात. गेल्या काही वर्षांमध्ये तरण तलावात मुलांचा बुडून मृत्यू होत आहे. त्यामुळे मुलांचे वय किमान ५ वर्षे तरी असले पाहीजे अशी अट घालण्यात आली होती. त्यानंतरच मुलांना प्रशिक्षण देण्यात येते.