वसई : VASAI RAIN TANSA RIVER : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वसईतल्या तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. दमदार पावसामुळे मेढे गावातला पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन नदीचे पाणी वाहू लागल्याने 12 गावांचा संपर्क तुटला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मेढे गावातला पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने 12 गावांसाठी सोयीस्कर आणि कमी वेळात जाण्यासाठी हा पूल म्हणजे एकमेव मार्ग होता. या पुलावरून वाहतूक सुरु असायची मात्र आता पूलच पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही पाणी ओसरेपर्यंत बंद राहणार आहे. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वसईतील तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. 



भाताने, नवसई, थळ्याचा पाडा, आडणई, जांभूळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा अशी  संपर्क तुटलेल्या 12 गावांची नावे आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराची भीती गावकरी व्यक्त करत आहेत.