किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले
दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडलाय. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत.
मुंबई : दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडलाय. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत.
बाजारात मालाची आवक कमी झाल्यानं भाव वाढलेत. पालेभाज्यांची गड्डी 80 रुपये, कांदा 40 रुपये किलो, कोबी 100 रुपये किलो तर फळभाज्या 80 ते 100 रुपये किलो एवढे दर कडाडलेत.
ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. यामुळेच त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, पुणे शहरातील घाऊक बाजारातील भाजीपाल्यांच्या किंमतीवर पाहायला मिळतोय.
पुणे, नाशिकमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागांमध्ये भाज्यांचा पुरवठा केला जातो. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेच भाज्यांचे दर कडाडलेत.