मुंबई : परतीच्या पावसाचा शेतमालावर परिणाम झालाय. भाज्यांचे दर कडाडलेत. पालेभाज्यांना सर्वाधिक फटका बसल्याने पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या तोंडावर परतीचा पाऊस जोरदार बरसतोय. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेत. जवळपास सगळ्याच भाज्या 70 ते 80 रूपये किलो दराने विकल्या जात आहेत. नाशिकच्या घाऊक बाजारात काही दिवसांपूर्वी टोमॅटो चार रूपये किलो दराने मिळत होता. तो आता 35 ते 40 रूपये किलोंवर गेलाय. 


नाशिकच्या बाजारात भाज्या कडाडल्या की मुंबईत त्याचे पडसाद उमटतात. मुंबईत सर्वाधिक भाजीपाला नाशिकमधून येतो. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये 750 गाड्यांची आवक झाली आहे. पालेभाज्यांची जास्त खराब होत असल्याने त्यांचे दर कडाडलेत.


फ्लावर -      २५-३०
कोबी -        २०-२५
भेंडी -          ३०-३५
काकडी -        ८-१०
वांगी-            ३५-३८
गवार -          ३०-४०
दुधी -          २०-२५
फरसबी -       ३५-४०
गाजर -        २०-२२
कोथींबीर जुडी  ६०-७५
मेथी -            ३५-४० दराने विकली जात आहे. 


पाऊस पडत असल्याने आणखी महिनाभऱ तरी अशीच स्थिती राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय. एकीकडे किराणा मालाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असताना ऐन दिवाळीत भाज्या मात्र चढ्या दरानेच खरेदी कराव्या लागणार आहेत.