मुंबई : 'हम जहाँ पे खडे होते है, लाईन वहीं से शुरु होती है...' हा सिनेमातील डायलॉग आपण कित्येकदा ऐकला असेल. पण, खऱ्या आयुष्यात या डायलॉगला साजेसा एखादा प्रसंग घडताना तुम्ही कधी पाहिलाय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहिला नसेल, तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ त्याचीच प्रचिती देत आहे. 


विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी काही दिवसांपूर्वीच जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. एका अतिशय आलिशान किल्ल्यामध्ये मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. 


जयपूरला रवाना होण्यापूर्वी विकी आणि कॅटला मुंबई विमानतळाच्या VIP गेटवर पाहिलं गेलं होतं. 


लग्नासाठी जात असताना तो या गेटवर उभा होता. मधूनच कॅमेऱ्यांना हातही उंचावरून त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत होता. 


विकीसाठी एकच गर्दी विमानतळावर झाली होती. तितक्याच तिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार विमानतळातून बाहेर येताना दिसले. 


अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवारही त्यावेळी त्यांच्यासोबत होत्या. ते यावेळी फोनवर बोलत बोलतच बाहेर आले होते. विकीकडे त्यांचं लक्षही गेलं नाही. 


अजित पवार विमानतळातून बाहेर पडत असताना त्यांच्या ताफ्यातील एका सुरक्षा रक्षकानं विकीला बाजुलाच केलं. 


विकी बाजुला होताच अजित पवार तिथून पुढे आले. कोणतीही हुज्जत न घालता विकी अतिशय शांतपणे बाजुला झाला.


काम करणाऱ्या लोकांच्या कामाला मान देत आणि समोरून येणारा व्यक्तीही महत्त्वाचा आहे याची जाण ठेवत विकी काही क्षणांसाठी बाजुला झाला. 



कॅमेऱ्यामध्ये हे सर्व क्षण टीपले गेले आणि पाहता पाहता सोशल मीडियावर हे सर्वच क्षण पाहता पाहता व्हायरल झाले.