मुंबई : स्वताचा जीव धोक्यात घालून एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटना वसईत घडलीय. हा सर्व प्रकार स्थानकातील cctv त कैद झाला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिला पोलिसानं या महिला प्रवाशाचा जीव वाचवलाय. वसई रोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून ४.१४ ला चर्चगेटकडे जाणारी लोकल पकडताना एक महिला खाली पडली. 


लोकल सुरू झाल्यानं ही महिला खाली पडली. लोकल आणि प्लॅट फॉर्मच्या सांधीत तिचे पाय गेले होते आणि ती फरपटत हलोकलसोबत पुडे जात होती. याच प्लॅट फॉर्मवर कर्तव्यावर असणाऱ्या सुमित्रा ओला यांना कळताच त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून महिलेचा हात पकडला. 


यावेळी त्या स्वता खाली पडल्या. पण महिलेचा हात न सोडता तसाच धरून ठेवला आणि तिचा जीव वाचविला आहे.



VIDEO: महिला पोलिसाने वाचवले महिलेचे प्राण