Aryan Khan Drugs Case : अटकेपूर्वी साक्षीदार गोसावीचा व्हिडिओ; खळबळजनक खुलासा
आर्यन खान प्रकरणातील साक्षीदाराचा अटकेपूर्वी व्हिडिओ व्हायरल
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीला महाराष्ट्राच्या पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावीला 2018 मध्ये फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. पण अटक होण्याआधी किरण गोसावीने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये तो आपले स्पष्टीकरण देत आहे आणि प्रभाकर साईलची चौकशी करण्याची मागणी करत आहे.
व्हिडिओमध्ये किरण गोसावी म्हणाला, 'नमस्कार, मी किरण गोसावी, मला प्रभाकर साईलबद्दल बोलायचे आहे. प्रभाकर साईल जे म्हणत आहेत त्याला या ठिकाणी उभं केलं त्या ठिकाणी उभं केलं. इतके पैसे घेतले, सॅम डिसोसाबद्दल बोलत आहे. सॅम डिसोझाकडून किती पैसे घेतले? प्रभाकर साईलला काय ऑफर मिळाली? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला प्रभाकरच्या गेल्या 5 दिवसांच्या मोबाईल रेकॉर्डमध्ये मिळेल.
पुढे गोसावी म्हणाला, 'मी मीडियाला अपील करतो साईल आणि त्याच्या दोन भावांचे सीडीआर रिपोर्ट आणि चॅट्स आणि माझे चॅट्स पाहा. तुम्हाला सर्व काही कळेल.' आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केल्याने याप्रकणी मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याच्या अटकेला दुजोरा दिला आहे.
सर्व सत्य बाहेर येईल - किरण गोसावी
एनसीबीचे साक्षीदार किरण गोसावी म्हणाले की, मराठी माणूस असल्याने मला एवढीच इच्छा आहे की, कोणत्याही मंत्री, कोणत्याही नेत्याने, मग ते विरोधी पक्षातील असो, सरकारमध्ये असो, मला पाठिंबा द्यावा आणि पोलिसांशी या प्रकरणाची चौकशी करा. सत्य बाहेर येईल. या प्रभाकरचा फोन शोधा, सर्व सत्य बाहेर येईल. असं गोसावी म्हणाला आहे.