मुंबई : मुंबईमध्ये मुलुंड रेल्वे स्थानकात किरकोळ कारणावरून एक इसमाला अज्ञात महिला आणि एक इसमाने चक्क धावत्या लोकल समोर ढकलून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपक चमनलाला पटवा असं मृत्यू झालेल्या इसमाचं नाव आहे. ते मुलुंड पश्चिमेला राह होते. शनिवारी दुपारी दीपक हे मुलुंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन वरून प्रवास करण्यास निघाले होते. एका प्लॅटफॉर्मवर झालेल्या किरकोळ वादावरून त्यांना धावत्या लोकलखाली ढकलून देण्यात आलंय. दीपक यांना ढकलणाऱ्या आरोपींमध्ये एका महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक यांचा प्लॅटफॉर्मवर येताना एका महिलेशी आणि पुरुषाशी शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीत या महिला आणि इसमाने त्यांना समोरून येणाऱ्या लोकल ट्रेन खाली ढकलले. त्यामुळे लोकलखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. 


या बाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदविला असून या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.  
पोलिसांच्या हाती या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय. त्याआधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असं आवाहन जीआरपीनं नागरिकांना केलंय.