PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई ते सोलापूर (Mumbai to Solapur) आणि मुंबई ते शिर्डी (Mumbai to Shirdi) या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसना (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) हा कार्यक्रम पार पडला. एका महिन्यात पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) हा दुसरा मुंबई दौरा आहे. याआधी 19 जानेवारीला पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच लोकार्पण झालं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मुंबई दौरे महत्वाचे ठरणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा मुंबई
दरम्यान मुंबईत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून आपल्या कॅमेरात आकाशातून मुंबई कशी दिसते याचा व्हिडिओ टिपला आहे. हा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अवघ्या एका तासात एक लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तर जवळपास पाच हजार लोकांनी कमेंट आणि 4 हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 21 सेकंदाच्या या व्हिडिओत मुंबईत समुद्रकिनाऱ्याचा भाग दिसत आहे. या व्हिडिओला पीएम मोदी यांनी Hello again Mumbai! असं कॅप्शन दिलं आहे. 



वंदे भारतचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेचं लोकार्पण करण्यात आलं. सीएसएमटीवरून मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या ट्रेन्सना मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत ट्रेन्स आर्थिक केंद्रांना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या ट्रेन्समुळे महाराष्ट्रातल्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांचा विकास अधिक वेगानं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


मुंबईकरांसाठी गिफ्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना खास गिफ्ट दिलंय.. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणा-या सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाचं आणि मालाडमधील कुरार गाव भुयारी मार्गाचं लोकार्पण आज पंतप्रधान मोंदीच्या हस्ते पार पडलं.. बीकेसी एमटीएनएल जंक्शन ते ग्रँड हयात हॉटेल दरम्यानच्या पुलामुळं मुंबईकरांच्या प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणाराय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते.