व्हिडिओ : असा गोल तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर व्हायरल
२१ व्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. मात्र, सोशलम मीडियावर एका गोलची चर्चा आहे. असा गोल तुम्ही कधी पाहिला नसेल?
मुंबई : २१ व्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. काल विश्व विजेत्या जर्मनीला धक्कादायक पराभवाचा धक्का बसला. आशियातील दक्षिण कोरिया संघाने विश्वविजेत्या जर्मनीला धूळ चारली आणि स्पर्धेतून आऊट केले. या सनसनाटी विजयानंतर कोरियाची चर्चा जोरदार आहे. मात्र, सोशलम मीडियावर एका गोलची चर्चा आहे. असा गोल तुम्ही कधी पाहिला नसेल?
सोशल मीडियावर सध्या फिफा फुटबॉलची धूम दिसत आहे. फुटबॉल सामन्यातील काही धम्माल व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत. असाच एक व्हिडीओ महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलाय. या व्हिडीओत एक मासा गोल करताना दिसत आहे.
महिंद्रा यांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे की, माझं वंडरबॉक्स वॉट्सअॅप माझ्यासाठी काय घेऊन येईल हे माहिती नाही. परंतु या व्हिडीओतील मासा हा समुद्रातील मेस्सी आहे.