Maharashtra Politics, मुंबई :  फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी तीन महिन्यांपूर्वीच  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (Shiv Sena emerged as Balasaheb Thackeray group) प्रवेश केला. पक्ष प्रवेश करताच सुषमा अंधारे यांची पक्षाच्या उपनेत्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सुषमा अंधारे यांच्या आक्रमकतेमुळे ठाकरे गटाला बळ मिळाले आहे. आपल्या भाषणांमधून सुषमा अंधारे शिंदे गटाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतात. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर देखील त्या सातत्याने घणाघाती टीका करत आहेत. सुषमा अंधारे यांची हीच आक्रमक भाषण शैली शिंदे गटाची डोकेदुखी बनली आहे. सुषमा अंधारेवर गुन्हा दाखल झाला, त्यांची सभा रद्द करण्यात आली. तरीही देखील सुषमा अंधारे आपल्या भूमिका मांडत आहेत. यामुळेच सुषमा अंधारे यांचे तोंड बंद करण्यासाठी शिंदे गटाने जबरदस्त प्लान आखला आहे. 


ठाकरे गटात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवसापासून सुषमा अंधारे सक्रिय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय मी घेतला असे म्हणत सुषमा अंधारे यांनी शिवसबंधन हातात बांधले. ठाकरे गटात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवसापासून सुषमा अंधारे सक्रिय आहेत. रॅली, मेळावे, जाहीर सभा यांच्या माध्यातून ठाकरे गटाची भूमिका मांडताना त्या शिंदे गटावर टीका करत आहेत. यामुळे सुषमा अंधारे सध्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या बनल्या आहेत. 


कायदा माझ्या बापाने लिहीलाय


वादग्रस्त भाषण केल्या प्रकरणी सुषमा अंधारे यांच्या वर ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर कायद्याच्या भाषेतच प्रतिक्रिया दिली होती. यानंतर देखील त्या सभांमधून आक्रमक भाषणं करतच आहेत. 


सुषमा अंधारेंवर भाषण बंदी आणण्याचा प्रयत्न


दोन दिवसांपूर्वीच सुषमा अंधारे यांच्या सभेवरुन जळगावात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. सुषमा अंधारे यांची जळगावातील सभा रद्द झाली. यानंतर सुषमा अंधारेंवर भाषण बंदी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.


सुषमा अंधारे शिंदे गटाची डोकेदुखी


सुषमा अंधारे यांची आक्रमक भाषण शैली शिंदे गटाची डोकेदुखी बनली आहे. आपल्या भाषणांमधून सुषमा अंधारे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते सर्व मंत्री तसेच भाजप नेत्यांवर देखील टीका करत आहेत. यामुळे सुषमा अंधारे यांना रोखण्यासाठी शिंदे गटाने विशेष योजना बनवली आहे. 


ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी  सुषमा अंधारे यांचा राष्ट्रवादीच्या सभेतील व्हिडिओ झाला होता व्हायरल 


ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच सभा गाजवल्या होत्या. जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर टीका केली होत्या. ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी  सुषमा अंधारे यांचा राष्ट्रवादीच्या सभेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता.  


सुषमा अंधारे यांचे व्हिडिओ शिंदे गट व्हायरल करणार


राष्ट्रवादीच्या संभांमध्ये सुषमा अंधारे यांनी  बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. याच भाषणाचे व्हिडिओ आता शिंदे गट व्हायरल करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सांगितले. तसेच सुषमा अंधारे या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या असल्याची टीका केसरकर यांनी केली. तसेच सुषमा अंधारे यांच्या विषयी काही टीका टिप्पणी करु नये अशा सूचना देखील त्यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना दिल्या आहेत.