मुंबई : विधानपरिषदेसाठी चूरस वाढली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पण राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळत काँग्रेसला झटका दिला आहे. काँग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचा विषयी आक्षेप नोंदवला होता. या आमदारांऐवजी त्याचे समवेत इतर सहकारीने मतपत्रिका बाँक्स मध्ये टाकल्या असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला होता. (State Election Commission Reject Congress Objection)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळल्यानंतर आता काँग्रेस दिल्ली निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे. तर भाजप देखील इमेल करुन याला उत्तर देणार असल्याचं समजतं आहे. 


विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या तक्रारीवर नाराजी व्यक्त केली आहे. ही तक्रार असंवेदनशील असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.


पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या कॅन्सरनं त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तरी देखील मतदान करण्यासाठी त्या विधानभवनात आल्या होत्या.  पक्षाने दिलेले आदेश मानायचे हे पहिल्यापासून आमच्या रक्तात आहे. त्यामुळे मतदाना केल्याचं मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे.


भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे देखील काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर ही उपचार सुरु आहेत. पण अशातही आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत.


विधानपरिषदेच्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने 5 उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होत आहे. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.