मुंबई : विधानपरिषदेच्या एका जागेच्या ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा रंगू लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपामध्ये प्रसाद लाड, माधव भांडारी, शायना एन सी यांच्या नावांची प्रामुख्यानं चर्चा आहे. राणे निवडणुकीत उतरले तर विरोधी पक्षांना शिवसेनेचीही साथ लाभण्याची दाट शक्यता आहे. 


मात्र दुसरा उमेदवार दिल्यास त्याला शिवसेनेचा विरोध नसल्यास भाजप उमेदवाराचा सहज विजय होऊ शकतो. त्यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. मात्र गेल्या विधान परिषद निवडणुकांचा अनुभन बघता ऐनवेळी भलतंच नाव पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.


भाजपमध्येही सध्या हायकमांड संस्कृती असल्यामुळे इच्छुक लॉबिंग करण्यापासून दूर आहेत. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होणार असून २७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा अखेर दिवस आहे.