लोकसभा निवडणुकीला मनसे राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने माघार घेतली आहे.  देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीमुळे माघार घेतल्याची माहिती नितीन सरदेसाईंनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरंजन डावखरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. डावखरे भाजपचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आहेत. डावखरे राज यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवरी  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मनसे रिंगणात उतरणार होती. त्या अनुशंगाने उमेदवार अभिजीत पानसे हे उमेदवार देखील जाहीर झाले होते. मात्र 3 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी निर्णय बदलला. आज सकाळी 9 वाजता झालेल्या बैठकीत प्रसाद लाड, निरंजन डावखरे उपस्थित होते. राज ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं असून कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने माघार घेतला आहे. मनसेचे अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार होते मात्र ते मागे घेण्यात आले आहे. यावरुन मनसेने पुन्हा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं दिसत आहे. 


यावर नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. पदवीधर निवडणूकीला मान देऊन आता अभिजीत पानसे निवडणूकीच्या अर्ज भरणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच आम्ही निवडणूक लढणार आहे, ही गोष्ट वारंवार होणार नाही. हे त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, अशी माहिती देखील दिली आहे. 


आमच्या पक्षासाठी हा फायदा होईल तो नंतर होईल आणि तुमचं लक्षात येईल असे देखील सरदेसाई यावेळी म्हणात. आमची निवडणूकीची तयारी झाली होती पण ही उमेदवारी आम्ही मागे घेतो कारण देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. मनसे सैनिक राज ठाकरे यांच्या मागे उभे आहेत आणि आमचा साहेबांवर विश्वास आहे . तसेच कोणतीही नाराजी नसल्याचं ते म्हणाले. 


आजच्या या दिवशी राज साहेबांनी पाठिंबा दिला या बाबत मी त्यांचे आभार मानतो. अभिजीत पानसे आणि मनसेचे खुप खुप आभार, असे प्रसाद लाड यांनी सांगितले. राजकारण आणि सर्व गोष्टी कॅमेऱ्यासमोर होतात. मी नेहमी कौटुंबिक सदस्य म्हणून आलो आहे आणि त्यांनी जो पाठींबा दिला. त्यामुळे हा विजय आमचा होणार असल्याच हे निश्चित असल्याचा विश्वास भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.