रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : INS विक्रांत बचाव ही मोहीम बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) आशीर्वादाने 1998 मध्ये सुरू झाली असा मोठा गौप्यस्फोट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी झी २४ तासवर केला आहे. भाजप-शिवसेना संयुक्त सरकार महाराष्ट्रात होतं,  विक्रांत वाचवा, त्याचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही बाळासाहेबांकडे गेलो होतो. त्यांच्या आशीर्वादानेच सेव्ह विक्रांत मोहीम आखली गेली असं सोमय्या म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 मध्ये त्यावेळच्या पृथ्वीराज सरकार आणि केंद्रातील काँग्रेस सरकारने निर्णय घेतला की विक्रांत भंगारमध्ये काढतोय. म्हणून 17 डिसेंबरला भाजप आणि शिवसेनेचं एक शिष्ठमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भेटलं. त्यानंतर मुंबई महापालिकेने प्रस्ताव केला आम्ही पैसे देतो, विक्रांतचं स्मारक करा. ही मोहिम होती. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून चर्चगेट स्थानकावर १० डिसेंबरला विक्रांत वाचवा या म्हणून उभे राहिले. डब्यात फक्त पाच पंधरा हजार रुपये गोळा होतात. 


विक्रांत निधी संकलन 10 डिसेंबर 2013 रोजी झालं. किरिट सोमय्या यांनी 58 कोटी रुपये ढापले असा आरोप होत आहे. हो मी कार्यक्रम केला होता. आता 11 वर्षांनी संजय राऊत यांनी मुद्दा काय काढला 58 कोटी रुपये गोळा केला. संजय राऊत अडकले आहेत म्हणून नौटंकी करत आहेत. 


संजय राऊत कारवाई झाली की दरवेळी काही तरी स्टंट करतात. आता नवीन आरोप सुरु आहे. INS विक्रांतचा 58 कोटी रुपयांचा घोटाळा. याची त्यांनी कागदपत्र द्यावीत. यशवंत जाधववर कारवाई झाली म्हणून यांची मुंबईला वेगळी करण्याची भाषा सुरु आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


पोलीसांकडे एकही कागदपत्र नाही तर पोलिसांनी रात्री एक वाजता एफआयआर कसा लिहून घेतला. कोर्टात लिहून दिलं पोलिसांनी की निल सोमय्या निर्दोष आहे काहीच कागदपत्र नाहीएत म्हणून. 


25 वर्ष महापालिकेत यांची सत्ता, यशवंत जाधव यांची कंत्राटदारांशी पार्टनरशिप. ज्या बुलेट जॅकेटचा ज्यांनी घोटाळा केला, तो विमल अग्रवाल यशवंत जाधवचा पार्टनर आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या सांगतो तर हा महाराष्ट्र द्रोही. कितीही आरोप झाले तरी ठाकरे सरकारच्या डर्टी डझनवर कारवाई होणारच असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.