मुंबई : नारायण राणे ईडीच्या चौकशीतून वाचता यावं यासाठी भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 स्वार्थासाठी राणेंनी काँग्रेस सोडली, आता त्यांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झाल्याचंही राऊतानी म्हटलंय. ते आज रत्नागिरीत बोलत होते.



 नारायण राणेंना भाजपा मंत्रिमंडळात घेणार नाही असा विश्वासही विनायक राऊतांनी व्यक्त केला. तळ कोकणात राणे आणि राऊत एकमेकांचे राजकीय वैरी आहेत.


 राणेंनी काँग्रेस सोडून भाजपची साथ धरल्यापासून शिवसेनेनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याचा पुढचा भाग आज रत्नागिरीत बघयाला मिळाला.