मुंबई : दिवंगत जेष्ठसाहित्यिक रा. ग. जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचं पत्र पाठवल्याबद्दल विनोद तावडेंकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. परभणीचे संघाचे कार्यकर्ते रमेश जाधव यांचा वाढदिवस  त्याच दिवशी होता, त्यामुळे केवळ नावातील साधर्म्यामुळे अनावधानाने रा ग जाधव यांना पत्र गेले असा खुलासा तावडेंनी केला आहे, अनवधानं घडलेल्याया चुकीमुळे तावडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे.


नेमकं काय झालं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक रा.ग.जाधव यांना, शालेय शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे विनोद तावडेंकडून चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छांचं पत्र पाठवण्यात आलं.


या पत्रावर विनोद तावडेंची सहीदेखील आहे.ज्येष्ठ साहित्यिक रा.ग. जाधव यांचं गेल्या वर्षी 27 मे 2016 रोजी निधन झालं होतं. ते प्रसिद्ध साहित्यिक तर होतेच मात्र माजी संमेलनाध्यक्ष ही होते. त्यामुळे सांस्कृतिक मंत्र्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. रा ग जाधव यांना त्यांच्या मृत्युपश्चात वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा दिल्या? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र याबद्दल विनोद तावडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.