मुंबई : एक रेल्वे गाडी जर मुंबई गोरखपूर गेली तर रेल्वे गाडीला ३५-४० लाख रुपये खर्च होतात, तिकिटामार्फत १०-१५ लाख रुपये वसूल होतात. राज्याबाहेर लोकांना जाण्यासाठी काँग्रेस मदत करणार आहे असं म्हणत आहे तशी मदत कोकणात जाण्यासाठी आपल्याच राज्यातील लोकांना करावी असं वक्तव्य भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. शिवाय, शिक्षण विभागाला अत्यावश्यक सेवेमध्ये आणलं पाहिजे, शिक्षक - मॉडरेटर यांच्याकडे पेपर गाडीमार्फत पोहचवले पाहिजे, म्हणजे वेळेत तपासून होतील. असं देखील ते यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे


- राज्याने केंद्राशी बोलणे आवश्यक आहे, SET ,NEET परीक्षा  कधी द्यायची आहे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.


- विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी बाबत कालावधी वाढवून देणे आवश्यक आहे.


- विनाअनुदानित  शिक्षक आणि कर्मचारी यांना वेतन मिळणे अवघड झाले आहे, तेव्हा याकडे सरकारने लक्ष द्यावे .


- कोरोना भीतीच्या सावटामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवले जाऊ शकते तेव्हा विद्यापीठांनी awareness campaign केलं पाहिजे , कारण विद्यार्थी dropout चे प्रमाण वाढू शकते.


- राज्यात ऑनलाईन शिक्षण हे शालेय स्तरावर अंमलात आणणे शक्य नसेल तर शिक्षण विभागाने स्वतःचे चॅनेल लवकर सुरू करावे, म्हणजे सॅटेलाईट चॅनेलच्या माध्यमातून शिक्षण देणे शक्य होणार आहे, तेव्हा राज्य सरकारने याबाबत लवकर धोरण ठरवावे.