देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ओल्ड एज गोल्ड असं म्हणतात आणि याचाच प्रत्यय आला तो म्हणजे दक्षिण मुंबईत आयोजित केलेल्या विंटेज कार रॅली मध्ये. २०० हून अधिक विंटेज कार आणि मोटर बाईक या रॅलीमध्ये पाहायला मिळाल्या. कार प्रेमींसाठी ही विंटेज रॅली एक पर्वणी ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९०३, १९२८, १९३१ म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळातील देखण्या आणि काहीशा हटके विंटेज कार मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाल्या.  इतकी वर्ष उलटून गेल्या नंतरही कारप्रेमींच यांच्या बद्दलचं आकर्षण अजिबात कमी झालं नाही. याचाच प्रत्यय आला दक्षिण मुंबईतल्या हॉर्निमल सर्कल ते बीकेसी अशा आयोजित विंटेज कार रॅलीमध्ये. मुंबईसह महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक कारप्रेमीं आपल्या विंटेज कार घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.


या कारसह जुन्या मोटर बाईक हे या रॅलीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. विशेष म्हणजे विंटेज कार असतील किंवा मोटर बाईक, स्कूटर तीन-तीन पिढ्यांनी यांचा सांभाळ कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच केलाय. गेल्या ६० वर्षांपासून विंटेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडियामार्फ़त या विंटेज कार रॅलीचं आयोजन केल जातंय. खासकरून लहान मुलं आणि तरुण यांना जुन्या काळातील गाड्या माहीत व्हाव्यात या उद्देशानं या रॅलीचं आयोजन केलं जातं.


एकूणच मुंबईच्या रस्त्यावर रोज देशी विदेशी नव नव्या आणि महागड्या गाड्या दिसतात. मुंबईकराना त्याचं आता फारस कुतूहल नसतं. मात्र या विंटेज कार आणि मोटर बाईकचं गारुड आजही मुंबईकर कारप्रेमींवर पाहायला मिळतं, म्हणूनच तर म्हणतात ओल्ड इज गोल्ड.