Yakub Memon : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट
1993 Mumbai blasts accused Yakub Memon : एक धक्कादायक बातमी. याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीच्या वादाची.
मुंबई : 1993 Mumbai blasts accused Yakub Memon : एक धक्कादायक बातमी. याकूब मेमन (Yakub Memon)याच्या कबरीच्या वादाची. मुंबईतील 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची बाब समोर आली आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे याकूब मेमनच्या कबरीवरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.
1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याच्या कबरीला व्हीआयपी ट्रेटीमेंट देण्यात आलीय. त्यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहे.
याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले. त्या ठिकाणच्या ओट्याला संगमरवरी फरशी बसवण्यात आलीय. त्यावर एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात. आता याकूबच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारा कोण? बडा कब्रस्तान ट्रस्टनं स्मशानभूमी विकली का, असे सवाल विचारले जात आहेत.
मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी दिल्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले.