मुंबईत विषाणूजन्य तापाची मोठ्या प्रमाणात साथ
विषाणूजन्य तापाची मोठ्या प्रमाणात साथ पसरलीय.
मुंबई : विषाणूजन्य तापाची मोठ्या प्रमाणात साथ पसरलीय. वातावरणातील बदलाचा हा परिणाम आरोग्यावर होत असून या तापामुळं मुंबईकर हैराण झालेत. तापाबरोबरच अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, थंडी वाजत असल्याच्या तक्रारी घेवून अनेक मुंबईकर सध्या रूग्णालयात येतायत.
गेल्या आठवड्यात दोन तीन वेळा झालेला पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कधी वाढलेला उष्मा, अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम विषाणूजन्य ताप पसरण्यामध्ये होतोय. तसंच आता पाऊस थांबल्यामुळं डेंग्यूचे रुग्णही वाढत असल्याची माहिती खासगी रूग्णालयातून मिळतंय. मात्र मागील वर्षाइतका मोठा धोका डेंग्यूचा दिसत नसल्यानं मुंबईकरांनी थोडा सुटकेचा निश्वास सोडलाय.