सोशल मीडियावर गाजतेय ही `बीएमसी ताई`
टीव्हीवर आणि सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीत ही `बीएमसी ताई` सध्या दिसतेय.
मुंबई : 'मी मुंबईसाठी काहीपण करेन' म्हणणारी बीएमसी ताई सध्या सोशल मीडियावर गाजते. टीव्हीवर आणि सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीत ही 'बीएमसी ताई' सध्या दिसतेय. मलेरिया निर्मूलनासंबंधी पालिकेच्या प्रयत्नांबद्दल जनजागृती करताना ही 'बीएमसी ताई' दिसतेय.
अधिक वाचा - मुंबई महानगरपालिका सुरु करणार 'वॉटर एटीएम'
अधिक वाचा - मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीची बरोबरी करणार?
अधिक वाचा - मुंबईकरांसाठी गुडन्यूज, नो पार्किंग दंडात मोठी कपात
घरोघरी जाऊन मुंबईच्या आरोग्याचा रेकॉर्ड ठेवणं तसंच बीएमसीच्या फ्री हेल्थ स्कीम्सबद्दल नागरिकांपर्यंत माहिती पोहचवणाऱ्या ३२,००० मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं ती प्रतिनिधित्व करतेय, असं या जाहिरातीत म्हटलं गेलंय. मुंबई महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा आणि फ्री आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहनही या व्हिडिओमधून करण्यात आलंय.
अधिक वाचा - ठाणे पालिकेनंतर आता मुंबई पालिकेचा कर्मचारी बँक खात्यांबाबत हा निर्णय?
अधिक वाचा - करिअर नाही तर तरुणांना सतावतेय 'रिलेशनशीप'ची चिंता!
अधिक वाचा - मुंबई पालिका डॉक्टरांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेला विरोध
मुंबई महानगरपालिका @mybmc तसंच आरोग्य विभागाच्या @mybmcHealthDept या ट्विटर अकाऊंटच्या सहाय्यानं सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय दिसतेय. सोशल मीडियावर नागरिकांनी नोंदवलेल्या अनेक तक्रारींची दखल घेण्यात आल्याचे अनेक पोस्ट या ट्विटर हॅन्डलवर दिसत आहेत.