Mumbai Viral Video : एखाद्या मुलं मोठ्यापणी काय करणार याचा प्रत्यय त्याच्या लहानपणाच्या उद्योगांवरून लावता येतो. म्हणूनच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आई वडिलांचे संस्कार आणि त्यांची शिकवण वारसा अनेक मुलं मोठीहून आपल्या खांद्यावर घेतात. आई जर नृत्य कलाकार असेल तर मुलींमध्ये तो गुण दिसतो. वडील उत्तम उद्योजक असतील तर मुलगा असो वा मुलगी मोठी होऊन धुरा सांभाळतात. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीची व्हिडीओ सगळ्यांचा आश्चर्यात पाडतोय. वाऱ्यासारखा सोशलवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच या चिमुकलीच्या प्रेमात पडाल हे नक्की. 


'किती गं तू गोड?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गोंडस...गोड मस्त पिंक ड्रेस घातलेली चिमुकली सोफ्यावर बसली आहे. तिच्या हातात छान छोटसं खरं खुरं गिटार आहे. तिच्या बाबांसोबत ती हे गिटार वाजवत Twinkle Twinkle Little Star ही इंग्रजी कविता गात आहे. ट्विटर ट्विटर लिटिल स्टार हे लहानपणापासून आपण प्रत्येकाने म्हटलेली कविता आहे. पण इतकी गोड खरंच कोणी म्हटली नसेल. इतक्या लहानपणी इतकं सुंदर आणि कुठल्याही गिटरवादकाला लाजेल असं गिटार तिने वाजलं आहे. त्याचा या गायणाला तिच्या वडिलांनी साथ दिली आहे. हा व्हिडीओ मन प्रसन्न करणारा आहे. 


प्रत्येक मुलाच काही तरी नक्कीच खास असतं. कोणी डान्स छान करतं तर कोणी खेळाड अव्वल असतो. काही मुलं तर अभ्यासात इतकी हुशार असतात की त्यांना काही विचारा ते प्रत्येक गोष्ट भराभरा सांगतात. या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहे. 


हेसुद्धा वाचा - Viral Video : मेकअप केलेल्या आईला पाहून चिमुकला घाबरला; त्याची प्रतिक्रिया पाहून हसणं थांबणारच नाही...


व्हिडीओ ट्रेंड


कोण आहे हे चिमुकली आणि कुठला आहे हा व्हिडीओ, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गोंडस चिमुकलीचं नाव आहे श्रीमयी चैतन्य प्रांजली गाडगीळ. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही फक्त 1 वर्ष 9 महिन्यांची आहे. इतक्या कमी वयात ही गिटार अशी वाजवते की जणू काही मास्टर आहे. तिच्या या गुणाचं गुपित तिच्या घरातच दडलं आहे. तिचे वडील चैतन्य गाडगीळ हे खुद्द एक प्रोफेशनल गिटार आर्टिस्ट आहेत. (viral video little girl played the guitar Twinkle Twinkle Little Star Social media trending video)


पाहा व्हिडीओ 



आई प्रांजली गाडगीळ हिच्या पोटात असताना पासूनच श्रीमयीने संगीताचा धडा गिरवला आहे. श्रीमयी मुंबईतील बोरीवलीमध्ये राहते. मोठ्यापणी ती आई वडिलांसोबत मुंबईचं नाव नक्कीत रोशन करेल यात शंका नाही.