मुंबई : आमदार नसीम खान यांच्यावर पैसे उधळतानाचा व्हिडियो वायरल होत आहे. या व्हिडिओत चांदिवली विधानसभेचे काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर गणेश मंडळात पैसे उडवले जात असलेले दिसत आहेत... धक्कादायक म्हणजे, नसीम खानदेखील हे सर्व आनंदाने आणि उत्सुकतेने पाहत आहेत. घाटकोपर येथील हिमालय मित्र मंडळातील हा प्रकार असून अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे. 


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चहूबाजुंनी जोरदार टीका होतेय.