मुंबई : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ अतीशय हास्यास्पद असतात. तर काही व्हिडिओंवर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन जातं. तर काही व्हिडिओ लोकं सतत बघणं पसंत करतात. (Viral Video of marriage where Bride relative tease groom, see what happend )  एवढंच नव्हे तर या व्हिडिओंवर अनेक जण कमेंट करण पसंत करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक लग्न हे त्या नववधु आणि नववरासाठी अतिशय खास असतात. या क्षणाला यादगार करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. अनेक याचं कौतुक होतं तर कधी याची मस्करी देखील केली जाते. सोशल मीडियावर नव दाम्पत्याचा राग आणि त्यांच्या नखऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 



व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, नव दाम्पत्य मंडपातील स्टेजवर बसले आहेत. नवऱ्याकडील एका व्यक्तीने नवऱ्याची मस्ती करायला सुरूवात केली. वराने अनेकदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकत नव्हते. अखेर कंटाळून तो वैतागला आणि नातेवाईकाला मारू लागला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळेच हैराण झाले. 


हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर युझर निरंजनने महापात्राने शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेकांनी यावेळी आपल्या लग्नाचे किस्से शेअर केलेत. तर काहींना याच व्हिडिओवर नव दाम्पत्याची किव आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.