Taj Hotel Tea: मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये जाऊन प्यायला 2124 रुपयांची चहा, मध्यमवर्गीय तरुणाचा VIDEO व्हायरल
Viral Video: मुंबईत आल्यावर `गेट वे ऑफ इंडिया`जवळ फिरायला जाणं हे अनिवार्यच आहे. तुम्हीदेखील गेट वे ऑफ इंडिया आणि त्याच्यासमोर असणाऱ्या ताज हॉटेलसमोर फोटो काढले असतील. ताज हॉटेलबाहेर फिरताना एकदा तरी आत जावं असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. एका तरुणाने नुकतंच आपलं हे स्वप्न पूर्ण केलं.
Viral Video: मध्यमवर्गीय कुटुंब नेहमीच आपल्या उराशी काही स्वप्नं बाळगून जगत असतं. मग ते स्वत:चं घर घेणं असो किंवा मग कार घ्यायची असेल. त्यातही जर मुंबईत घर असेल तर एकदा तरी ताज हॉटेलमध्ये (Taj Hotel) कुटुंबाला घेऊन जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आधीच खिशावर आर्थिक बोझा असताना हे आलिशान जगणं परवडमारं नसतं. त्यामुळे अनेकजण हे स्वप्न सत्यात उतरवताना घाबरतात. मात्र नुकतंच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाने आपलं हे स्वप्न पूर्ण केलं. ताज हॉटेलमध्ये जाऊन त्याने चहाचा आस्वाद घेतला. त्याने इंस्टाग्रामला (Instagram) शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चहा हे पेय तसं भारतीयांचं प्रिय आहे. घरामधील बाल्कनीपासून, ते नाक्यापर्यंत अनेक ठिकाणं ही चहा पिण्यासाठी आवडती असतात. पण चहा पिण्यासाठी तुम्ही किती पैसे मोजू शकता? असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल. 10 ते 100 रुपयांपर्यंत असं कदाचित तुमचं उत्तर असू शकतं. पण जर तुम्हाला एका चहासाठी 2000 रुपये मोजावे लागले तर, नक्कीच विचार कराल. पण नुकतंच एका तरुणाने ताजमहल हॉटेलमध्ये इतक्या महागड्या चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्याने चहासोबत अजून काय मिळतं याबद्दलही सांगितलं.
व्हिडीओच्या सुरुवातीला तरुण गेट वे ऑफ इंडियासमोर उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी तो सांगतो की, तुम्ही माझ्या मागे भारतातील पहिलं पंचतारांकित हॉटेल ताजमहल पॅलेस पाहू शकता. या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यावा असं अनेक लोकांचं स्वप्न असतं. ते स्वप्न आज या मध्यमवर्गीयाचं पूर्ण होत आहे. आज आम्ही ताज हॉटेलमध्ये भारतीय चहा पिणार आहोत. यानंतर तो ताज हॉटेलमध्ये जातो आणि तेथील व्हिडीओ दाखवतो.
यानंतर तो एक कप चहा ऑर्डर करतो ज्याची किंमत 2124 रुपये आहे. चहासोबत 2 वडापाव, 2 ग्रिल सँडविच, काजूकत्री हेदेखील मिळतं. तथापि, शेवटी तरुणाने चहा कसा होता याबद्दल मत मांडल. चहाची चव अगदी सामान्य होती असं सांगत तो चहाला 10 पैकी 5 गुण देतो.
2100 मध्ये अर्ध्या महिन्याचे रेशन येईल
अदनान याने 8 नोव्हेंबरला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, मुंबईत ताज हॉटेलमधी चहा. ही रील आता व्हायरल झाली आहे.
या पोस्टवर साडेसहा हजारपेक्षा जास्त लोकांनी कमेंटही केल्या आहेत. काही लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या तर काहींनी अदनानचे कौतुक केले. एकाने म्हटलं आहे की, मी मुंबईत मोठा झालो आहे पण आजपर्यंत ताज हॉटेलमध्ये चहा प्यायलेलो नाही. आणि तू केलास भाऊ. दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, 2100 मध्ये अर्ध्या महिन्याचे रेशन येईल.