Mumbai Viral Video : सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ  वेगाने व्हायरल झाला होता. बाईकवर दोन मुलींना बसवून एक तरुण स्टंट (Bike Stut) करतानाचा हा व्हिडिओ होता. एका मुलीला बाईकच्या पुढे आणि एका मुलीला बाईकच्या मागे बसवून हा तरुण स्ंटट करत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. हा तरुण मुंबईतला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई करत त्या तरुणाला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी (Mustak Ansari) यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल झाला. यावर नेटकऱ्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केला होत्या. मुश्ताक अन्सारी यांनी Pothole Warriors नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांना टॅग केला होता. 


मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचं नाव फैयाज अहमद अजीमुल्ला कादरी असं आहे. मुंबईतल्या बीकेसी पोलिसांनी (BKC Police) या तरुणाला अटक केली आहे. हा तरुण वडाळा परिसारात राहातो. या तरुणाविरोधातली ही पहिलीच केस नाहीए तर याआधीही वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस आणि अँटोप हिल पोलीस स्टेशनमध्ये फैयाजविरोधात तक्रार दाखल आहेत. पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी तो आपल्या घराचा पत्ता सातत्याने बदल होता. याआधी त्याला साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, फैयाजबरोबर त्या दोन मुली कोण होत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. 


काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियात व्हायरल होणारा हा व्हिडिओ 13 सेकंदाचा आहे. धावत्या बाईकवर हा तरुण स्टंट करताना दिसत आहे. बाईकवर एक तरुणी पुढे बसली आहे तर, दुसरी तरुणीने मागे बसली असू या दोघींच्या मध्ये हा तरुण बसला आहे. रात्रीच्यावेळी सुमसाम रस्त्यावरुन हा तरुण वेगाने बाईक चालवताना दिसत असून मध्येच बाईकचं पुढचं चाक उचलून व्हिली मारताना व्हिडिओत दिसत आहे. यावेळी पुढे बसलेली मुलगी देखील मध्येच आपले हात सोडून देत स्टंट करताा दिसात आहे.