मुंबई : रेल्वे अधिकारी, पोलीस हवालदार आणि इतर कर्मचारी त्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे स्टेशनवरती एक मोठी दुर्घटना होण्यापासून बचावले आहे. ही घटना दादारच्या स्टेशनवरती घडली आहे. जेथे एक प्रवाशी ट्रेन खाली जाण्यापासून वाचला आहे. या घटनेचा व्हिडीओ स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि आता ही घटना सर्वत्र सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ खरोखर खूपच धक्कादायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादर स्टेशनवर ड्युटीवर असताना नागेंद्र मिश्रा नावाच्या वरिष्ठ तिकीट परीक्षकांना (टीसीने) चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत एक प्रवासी पडताना दिसला. तेव्हा धावत जाऊन त्याला मागे खेचले, ज्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. नागेंद्र मिश्रा यांची समजूतदारपणा, धाडस आणि तत्काळ कारवाईमुळे हा व्यक्ती ट्रेन खाली जाण्यापासून वाचला आहे.


खरेतर हा प्रवासी ट्रेनच्या बाजूला उभा होता, तेवढ्यात ट्रेन सुरू झाली, ज्यानंतर थोडं चालत जाऊन त्याने ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि तो ट्रेनमध्ये चढणार इतक्यात त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. ज्यानंतर तेथे उपस्थीत टीसी आणि प्रवासी त्याला मागे खेचतात आणि त्याचे प्राण वाचवतात.



काही आठवड्यांपूर्वी अशीच एक घटना पाहिली होती जिथे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी एक महिला अशीच पडली आणि त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्याने तिचा जीव वाचवला. मुंबईच्या सँडहर्स्ट स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात स्टेशनवर पडणाऱ्या 50 वर्षीय महिलेचा जीव आरपीएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने वाचवला.