अतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : सलग 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावणाऱ्या डोंबिवलीकर विशाकने सोमवारी सकाळी आठ वाजता विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे .या आधी सलग 60 दिवस 42 किमी धावण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होता..आता हा विक्रम विशाल ने मोडत आपल्या नावाने नवा विक्रम नोंदवला आहे. त्याच्या या मेहनतीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness Book of World Records) घेतली आहे. आज विशालने विश्वविक्रमाला गवसणी घातल्यांनंतर (KDMC) महापालिका आयुक्त, डोंबिवली मधील विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनीधींनी विशालचं कौतुक केले..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल स्वामी (vishal swami ) (29) डोंबिवली स्टार कॉलनी मध्ये आपली आई ,वडील बहिणी सह राहतो. विशाल हा मूळचा केरळचा आहे मात्र त्याचं कुटुंब उदारनिर्वाहासाठी डोंबिवलीत स्थायिक झालं. विशाल एका खाजगी विमा कंपनीत काम करतो. गेल्या सात वर्षापूर्वी विशालला धावण्याची आवड आहे. 


पण त्याने धावणे ही फक्त आवड न ठेवता त्यात विश्वविक्रम (world record) केलं आहे. आतापर्यंत विशालने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. विशालला कायम त्याच्या आई आणि बहिणीकडून पाठिंबा मिळाला. 


याच दरम्यान कॅन्सर जनजागृतीसाठी धावणाऱ्या कॅनडामधील टेरीफॉक्स या इसमाची कथा त्यांनी ऐकली त्यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवला. आता लोकांमध्ये धावण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशाल आपलं धावणं सुरूच ठेवणार आहे. 


डोंबिवली (Dombiwali) पूर्वेकडील क्रीडा संकुलात त्याने एक सप्टेंबर पासून पुन्हा धावणे सुरू केलं. दररोज पहाटे तीन वाजता विशाक डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा. तीन वाजेपासून सुरू झालेलं त्याचं धावणं आठ वाजेपर्यंत सुरूच असायचं. 


त्याला धावताना पाहून अनेक डोंबिवलीकरांना प्रश्न पडायचा की हा इतका का धावतोय. काही दिवसांनी त्याच्या धावण्याचे कारण समजतात डोंबिवलीकरांनी देखील त्याला प्रोत्साहन दिलं. आज 61 व्या दिवशी त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. 


विश्वविक्रम आपल्या नावावर करताच डोंबिवलीकरांनी विशालचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. यावेळी विशालने पाठींबा व प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले माझं धावणं पुढे सुरू सुरू ठेवणार असल्याचे सांगितलं. 61 दिवस झाले आता शंभर दिवसापर्यंत मी धावणार असल्याचा आत्मविश्वास विशाक यावेळी व्यक्त केला.