कोरोनाविषयीच्या सूचना देत फोनवर येणारा `तो` आवाज कोणाचा माहितीये?
कुठेही फोन लावा, हा आवाज सध्या ऐकू येत आहे
मुंबई : Coronavirus 'कोरोना व्हायरस या कोविड 19 से आज पूरा देश लढ रहा है...', 'नमश्कार, कोरोना व्हायरस को रोकना मुमकीन है...', 'हमे बिमारी से लढना है बिमार से नही....' या अशा ओळी कोणालाही फोन केल्यानंतर प्रत्येक वेळी कानांवर पडतात. काही महिन्यांपासून वैश्विक महामारी असणाऱ्या कोरोना व्हायरसविषयी जनजागृती करणआरा हा आवाजही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसला आहे.
वेळोवेळी कोरोना व्हायरस किती घातक आहे हे सांगण्यासोबतच त्याच्यापासून स्वत:चं रक्षण कसं करावं यायविषयी सांगणारा हा आवाज कोणाचा आहे माहितीये?पडला ना तुम्हालाही हा प्रश्न?
कोरोना व्हायरसविषयी जनजागृती करत असतानाच सामाजिक बांधिलकीविषयीचाही संदेश देणारा हा आवाज आहे, जसलीन भल्लाचा. एका मुलाखतीत नुकतंच जसलीनकडून तिच्या या अतिशय गाजणाऱ्या प्रोजेक्टबाबत उलगडा करण्यात आला. जिथे एक क्रिडा पत्रकार असल्यापासून कशा प्रकारे व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट म्हणून आपण नावारुपास आलो याचा खुलासा जसलीननं केला.
जवळपास दहा वर्षांपासून आवाजाच्या या दुनियेत रमलेल्या जसलीन हिनं आजवर बऱ्याच जाहिरातींना आवाज दिला आहे. मुख्य म्हणजे कोरोना बाबतच्या मार्गदर्शक आणि प्रतिबंधात्मक उपायांसाठी दिलेला हा आवाज फोनसाठी वापरण्यात येणार असल्याची तिलाही कल्पना नव्हती.
Unlock 1 : सैफ, करीनासह तैमूर मरीन ड्राईव्हवर; VIDEO VIRAL
वारंवार फोन केलं असता गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित व्यक्तीच्या आवाजापूर्वी सर्वांनाच जसलीनचा आवाज ऐकू येत आहे. याचबाबत प्रश्न विचारतस्वत:चाच आवाज ऐकून तुला कसं वाटतं असा प्रश्नही तिला या मुलाखतीदरम्यान करण्यात आला होता. ज्याचं उत्तर देत जसलीनने हा 'out of body' अनुभव असल्याचं सांगितलं. आपल्याला आपल्याच आवाजातील या सूचना ऐकताना काहीसं विचित्रही वाटत असल्याची प्रतिक्रिया तिनं दिली. सोशल मीडियावर जसलीनची ही मुलाखत सध्या भलतीच व्हायरल होत आहे.