मुंबई : मिरा-भाईंदर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार भाजपच्या 21, शिवसेना 2, काँग्रेस 5 इतर उमेदवारांपैकी एक उमेदवार आघाडीवर आहेत.


रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कारण सर्वच पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवलीय. मात्र खरी लढाई ही शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. आता मतदारराजा कोणाला कौल देतो हे निकालानंतर स्पष्ट होईल.