ग्राहकांचं बॅंक अकाऊंट रिकामी करणारे बारमधील वेटर गजाआड
विरार पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई : बार आणि हॉटेलमध्ये जेवण अथवा पार्टी करुन एटीएमनं पैसे देणा-या ग्राहकांच्या स्टीमर मशिननं डाटा मिळवून त्यांच्या खात्यातुन पैसे काढणा-या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या रॅकेटमधील दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
विरारमधील प्रसाद प्रकाश भोईर यांच्या खात्यातून १७ हजार ५९२ रुपये बिहारमधील एटीएममधून काढल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यावरुन विरारच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमनं याचा तपास केला.
अश्रय बारमधील दोन वेटर गायब असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. या महितीच्या रविकुमार यादवला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. आणि त्याच्याकडे एटीएम स्टीमर मशीन पोलिसांना मिळाली.