मुंबई : मागील काही काळापासून coronavirus कोरोना व्हायरसनं थेट आपल्या जीवनावर परिणाम केल्याचं पाहायला मिळत आहे. Mumbai मुंबईतही मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळं प्रशासनापुढं हे मोठं आव्हानच आहे. अशा परिस्थितीतच अनेक परींनी सकारात्मकता कशी राखली जाईल याकडेच अनेकांचा कल दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या संसर्गामुळं सर्वत्र एक वेगळ्याच प्रकारची भीती पाहायला मिळत आहे. त्यामुळं या वातावरणातही येऊ घातेलल्या सण उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आता थेट कोविड सेंटरमध्येच काही कमालीची पावलं उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


सध्याच्या घडीला कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. पण, नवरात्रोत्सवाचा हा उत्साह कोविड सेंटरमध्ये मात्र तितक्याच धमाकेदार अंदाजात पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर नुकताच याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या नेस्को कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये खाटांभोवती असणाऱ्या जागेत गरब्याचा सुरेख फेर धरला गेल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. 



 


सकारात्मकतेची एक वेगळीच उर्जा या वातावरणात पाहायला मिळत आहे. हे पाहता उत्सवाच्या या आनंदालाही आता वेगळ्या पद्धतीनं अनुभवण्याचं कसब सर्वांनीच आत्मसाद केलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मुळात कोरोनावर मात करण्यासाठीची ही एकी पाहता येत्या काळात या व्हायरसवर मात करण्यातही यश येईल अशीच आशा अनेकांनी व्यक्त केली आहे.