मुंबई : पावसाची वाट पाहून मुंबईकर वैतागले आहेत. त्यामुळे पावसा सारख्याच थंड आणि गारगार वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटर किंगडमकडे वळली आहेत. पर्यटक आपल्या  विकेंडच्या सुट्ट्या वॉटर किंगडमच्या थंड वातावरणात घालवत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



वॉटर किंगडममध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. असंख्य पर्यटक आपला विकेंड वॉटर किंगडममध्ये एन्जॉय करत आहेत. हा विकेंड पर्यटकांसाठी खुप आनंददायी ठरत आहे.  



वॉटर किंगडममध्ये जगातील सर्वात मोठ्या वेव पूलचा आनंद लूटता येणार आहे. या वेव पूलमध्ये तूम्हाला निळ्याशार समुद्रात स्वत: ला झोकून देत, उंच उंच लाटाचा अनुभव घेता येणार आहे.



रोलर कोस्टर राइड्स नेहमीच मजेदार असतात. पाण्यातून या राईडवरून वाहत जाण्याची मजाच काही और असते. फोटोत पाहू शकता पर्यटक या राईडचा कसा आनंद घेतायत.   



वॉटर किंगडममध्ये लहान मुलांसाठीही राईडस आहेत. फोटोत आपण पाहू शकता लहान मुलं या छोट्याश्या राईडवर पाण्यातून घसरत आनंद घेताना दिसत आहेत.  



जर तुम्ही अजूनही तिकीट बुक केली नसेल तर https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच तिकीट बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.