मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात ही पाऊस बरसला आहे. पण पहिल्याच पावसात मुंबईत काही भागात पाणी साचल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. मुंबईतल्या हिंदमाता परिसरात पाणी साठलं आहे. मेट्रोकामामुळे मुंबई तुंबण्याची शक्यता खुद्द महापौरांनी व्यक्त केली होती. दुसरीकडे मुंबईतील नालेसफाईची कामे अपुरी असल्याचं समोर आलं होतं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल सेवेवर देखील पावसाचा परिणाम पाहायला मिळतो आहे. लोकल उशिराने धावत आहेत. अचानक आल्याने पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे.



पावसासोबत अनेक ठिकाणी जोरदार वारा सुटल्याने ठाण्यात झाडं कोसळली आहेत. मुंबईसह उपनगरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वीज गायब झाली आहे.