मुंबई : मुंबई किंवा इतर कुठल्याही शहरात जलवाहिनी फुटणं हे तसं नित्याचंच. पण मुंबईतल्या बोरीवलीतील चिकुवाडीत रविवारी फुटलेलं याच जलवाहिनीमुळे जे घडलं त्याची कुणी स्वप्नातही कल्पना करु शकणार नाही. रविवारी संध्याकाळी चिकुवाडी परिसारतील महापालिकेची जलवाहिनी फुटली. यानंतर संपूर्ण भागात पाणीच पाणी झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलवाहिनीतून जोरदार जलप्रवाह बाहेर आला. त्यात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्याही हवेत फेकल्या गेल्या. जलवाहिनीचा हा उत्पात सीसीटिव्ही व्हिडीओ समोर आलाय. 26 तारखेला रात्री 1 ते 2 च्या सुमारास चिकुवाडी परिसरात 6 इंच पाण्याची पाईपलाईन फुटली. अतिउष्ण दाबामुळे ही पाईपालाईन फुटल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात पाणीचपाणी झाले आहे.



पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्य़ाचा दाब इतका जोरात होता तीथे पार्क केलेल्या 4 गाड्यांचे नुकसान झाले तसंच पाईपलाईन फुटली तो रस्ताही पाण्यामुळे खचला आहे. कालपासून परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम आजही सुरू आहे. लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.