Mumbai News : समाधानकारक पाऊस होऊनही मुंबईवर पाणीकपात किंवा अमुक एका भागात पाणी पुरवठा बंदची परिस्थिती नेमकी का ओढावते? यामागे कारणं असतात ती म्हणजे दुरुस्तीची कामं, एखाद्या ठिकाणी यंत्रणेत झालेला बिघात किंवा पाईपलाईनला झालेलं नुकसान. शहरातील नागरिकांना आता पुन्हा एकदा अशाच काहीशा परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीची कामं हाती घेतल्यामुळं शहरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण या विभागांमधील पाणीपुरवठा 31 ऑक्टोबर 2023 अर्थात, मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार के/पूर्व जलवाहिनी जोडण्यासोबतच स्ट्रक्चरल ऑडिटतचं कामही हाती घेण्यात येणार असल्यामुळं  31 ऑक्टोबरसा सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील, पालिकेच्या या निर्णयामुळं के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांवर याचा थेट परिणाम होणार असून, 15 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळं नागरिकांनीही त्यासाठी पूर्वनियोजन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. 


 


कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद? 


के पूर्व विभाग - त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर,जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाउस, विजय राउत रस्ता , पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग , साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग , श्रद्धानंद  मार्ग , नेहरू  मार्ग , तेजपाल  मार्ग , शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विले-पार्ले पूर्व , अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग , मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग , पारसी पंचायत मार्ग , आर. के. सिंग रस्ता , निकोलसवाडी परिसर. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : मुंबई, नवी मुंबईसह इतर जिल्ह्यांच्या तापमानात घट; हाच तो हिवाळा? पाहा हवामान वृत्त 


के पश्चिम विभाग - जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग , सहकार मार्ग , बांदिवली हिल.  


पी दक्षिण -  राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा) 


15 तासांमध्ये पालिका कोणकोणती कामं पूर्णत्वास नेणार? 


पाणीपुरवठा बंद असलेल्या 15 तासांमद्ये के पूर्व विभागातील महाकाली गुंफा मार्गावर नवी 1500 मिमी व्यासाची जलवाहिनी, वर्सोवा आऊटलेट येथे 200 मिमीव्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम पूर्ण केलं जाईल. तर काही भागांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल.