मुंबई : मुंबईच्या समुद्रात लवकरच एफ वनसारखे वॉटर स्पोर्टस सुरु होणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केलीय. आणखी एक खूषखबर म्हणजे मुंबईतल्या समुद्रांमध्ये लवकरच दोन फ्लोटिंग रेस्टॉरंटस सुरु होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यापासून ही रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार आहे. मुंबईतल्या गेटवे आणि गिरगाव चौपाटीवर ही फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. नितीन गडकरींनीच यासंदर्भातली माहिती दिलीय. 


देशातील प्रमुख बंदरातील गोदी कामगारांना दरमहिन्याला ४ हजार ते १६ हजार रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. इंडियन पोर्ट असोसिएशन आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या वेतन काराराला मान्यता देण्यात आली.